दोन युवकांच्‍या आत्‍महत्‍यांनी मलकापूर हादरले!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकाने घरात गळफास तर दुसऱ्याने शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याने मलकापूर शहर काल, १८ सप्टेंबरला हादरले. किशोर वसंता वानखेडे (२९, रा. मंगलगेट, मलकापूर) व रोशन मुरलीधर टावरी (३८, रा. वृंदावननगर, मलकापूर) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. किशोरने काल दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीने गळफास लावून …
 
दोन युवकांच्‍या आत्‍महत्‍यांनी मलकापूर हादरले!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकाने घरात गळफास तर दुसऱ्याने शेतात विष घेऊन आत्‍महत्‍या केल्याने मलकापूर शहर काल, १८ सप्‍टेंबरला हादरले.

किशोर वसंता वानखेडे (२९, रा. मंगलगेट, मलकापूर) व रोशन मुरलीधर टावरी (३८, रा. वृंदावननगर, मलकापूर) अशी आत्महत्‍या केलेल्यांची नावे आहेत. किशोरने काल दुपारी साडेतीनच्‍या सुमारास राहत्‍या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीने गळफास लावून घेतला. रोशनने वृंदावननगरच्या मागे असलेल्या शेतातील आंब्याला झाडाखाली विष घेतले. दोन्‍ही घटनांप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. तपास शहर पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत दोघांच्‍याही आत्‍महत्‍येचे कारण समोर आले नव्हते.