दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ मांडला; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन लाख रुपयांसाठी २५ वर्षीय विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध जलंब पोलिसांनी काल, २० ऑगस्टला सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. २६ फेब्रुवारी २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे ती सध्या माहेरी राहत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती राजेंद्र सोपान तायडे (३२, रा. योगीराज कॉलनी …
 
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ मांडला; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन लाख रुपयांसाठी २५ वर्षीय विवाहितेचा छळ मांडणाऱ्या पतीसह सासरच्‍या मंडळीविरुद्ध जलंब पोलिसांनी काल, २० ऑगस्‍टला सायंकाळी गुन्‍हा दाखल केला आहे. २६ फेब्रुवारी २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१ दरम्‍यान तिचा छळ करण्यात आला. त्‍यामुळे ती सध्या माहेरी राहत असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

पती राजेंद्र सोपान तायडे (३२, रा. योगीराज कॉलनी घाटपुरी, ह. मु. कल्याणीनगर, तांदुळवाडी ता. बारामती जि. पुणे), सासरे सोपान तायडे (५४), सासू सौ. केसर सोपान तायडे (३५), जेठ विनोद सोपान तायडे (३०), जेठाणी सौ. दिपाली विनोद तायडे (२७, सर्व रा. योगीराज कॉलनी, घाटपुरी खामगाव) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सौ. श्रद्धा राजेंद्र तायडे (रा. अबोडा, ता. नांदुरा) हिने या प्रकरणात तक्रार दिली. पती राजेंद्रने तिला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

सासरे, सासू, जेठ, जेठाणीने माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला व शारीरिक व मानसिक छळ केला. सौ. श्रद्धाच्‍या वडिलांनी लग्नात दोन लाख रुपये व १ सोन्‍याची चैन व अंगठी दिली होती. आताही सासरची मंडळी दोन लाख रुपयांची मागणी करत आहेत. दोन लाख रुपये माहेरहून घेऊन ये तरच येथे राहा. नाही तर तुझ्या माहेर निघून जा, असे तिला धमकावण्यात आले होते. त्यामुळे गेल्या ८ महिन्यांपासून सौ. श्रद्धा वडिलांच्या घरीच राहते. तिला दीड वर्षाची मुलगीही असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सौ. श्रद्धाच्‍या पती, सासरे, सासू ,जेठ, जेठाणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार दिनकर तिडके करत आहेत.