दोन संजयांच्‍या मागणीत जिल्हाधिकाऱ्यांनी भरला ‘हुंकार!’

बुलडाणा ( मनोज सांगळे, मो. 98229888820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने पेट्रोलपंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतल्यांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र सध्या शेती मशागतीचे दिवस असल्याने ट्रॅक्टरद्वारे होणारी कामे इंधनाअभावी रखडली असल्याचे जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे आणि बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. …
 

बुलडाणा ( मनोज सांगळे, मो. 98229888820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने पेट्रोलपंपावर केवळ अत्‍यावश्यक सेवेतल्यांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र सध्या शेती मशागतीचे दिवस असल्याने ट्रॅक्‍टरद्वारे होणारी कामे इंधनाअभावी रखडली असल्याचे जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे आणि बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्‍या लक्षात आणून दिले. या मागणीचा सकारात्‍मक विचार करून काल, 11 मे रोजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ट्रॅक्‍टरसाठी डिझेल पुरवठा करण्यास पेट्रोलपंप चालकांना परवानगी दिली.