दोस्त दोस्त ना रहा… बाहेरगावी गेल्याची संधी साधून मित्राच्या बायकोवर पडली वाईट नजर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मित्र बाहेरगावी गेल्याची संधी साधत मित्राच्या घरात घुसून त्याच्या बायकोचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुलडाणा शहरात 27 फेब्रुवारीला दुपारी घडली. सुंदरखेडच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा बोदवड (जि. जळगाव) येथील महेंद्र शरद पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 38 वर्षीय महिला बुलडाण्यातील एका खासगी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मित्र बाहेरगावी गेल्याची संधी साधत मित्राच्या घरात घुसून त्याच्या बायकोचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुलडाणा शहरात 27 फेब्रुवारीला दुपारी घडली. सुंदरखेडच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा बोदवड (जि. जळगाव) येथील महेंद्र शरद पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार 38 वर्षीय महिला बुलडाण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तिचा पती आणि महेंद्र पाटील दोघे चांगले मित्र. यामुळे महिलेची आणि महेंद्रचीही ओळख होती. मात्र महेंद्रची तिच्‍यावर नजर फिरली. तो तिला नेहमी फोन करून तुला झोप येत नसेल तर माझ्याशी बोलत जा, असे म्हणत फोन करायचा. दरम्यान पीडितेचा पती अलिबाग जि. रायगड येथे गेल्याची माहिती महेंद्रला मिळाली. त्याने तिला फोन केला व म्हणाला, की तुझ्या नवऱ्याचे व माझे भांडण झाले आहे. मी त्याचा गेम करणार आहे. तू त्याच्या भरवशावर राहू नको , असे म्हणत फोन कट केला. काल दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान तो महिलेच्या घरी आला. घरात घुसून महिलेला रूममध्ये ओढले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला. थोड्या वेळाने त्याने पुन्हा महिलेच्या फोनवर फोन केला. महिलेने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली असता तू कुठेही जा. माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही, असे महेंद्रने धमकावले. रात्री उशिरा याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.