धक्कादायक..! अकरावीच्या विद्यार्थ्याचा 29 वर्षीय तरुणीवर बलात्कार!; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अकरावीत शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थ्याने 29 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथे घडली आहे. ही तरुणी गतिमंद असल्याचे सांगण्यात आले. काल, 6 फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रात्री उशिरा बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.29 वर्षीय तरुणी विधवा आईसोबत पळसखेड नाईक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अकरावीत शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्याने 29 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथे घडली आहे. ही तरुणी गतिमंद असल्याचे सांगण्यात आले. काल, 6 फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रात्री उशिरा बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
29 वर्षीय तरुणी विधवा आईसोबत पळसखेड नाईक येथे राहते. आई हातमजुरी करून उदरनिर्वाह चालवते. काल दुपारी तिची आई शेतात कामासाठी गेली असताना अल्पवयीन मुलाने तिच्या घरात घुसून बलात्कार केला. मुलीच्या ओरडण्याने हा प्रकार शेजार्‍यांच्या लक्षात आला. शेजारी धावून आल्याने तो पळून गेला. मुलीच्या आईला बोलावण्यात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बुलडाण्याच्या सरकारी रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो फरार असल्याने त्याचे वय निष्पन्न झाले नसल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. रामपुरे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.