धक्कादायक… दीड वर्षाच्या चिमुकल्याला फाशी देऊन तरुण पित्याचीही आत्महत्या; संग्रामपूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील कुंदेगाव येथील २६ वर्षीय तरुणाने आपल्या दीड वर्षीय चिमुकल्यासह स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. ही हृदयद्रावक घटना आज, 28 मे रोजी सकाळी समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील कुंदेगाव येथील २६ वर्षीय तरुणाने आपल्या दीड वर्षीय चिमुकल्यासह स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. ही हृदयद्रावक घटना आज, 28 मे रोजी सकाळी समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिनेश पुंडलिक वानखडे असे या पित्याचे नाव असून, रोशन असे चिमुकल्याचे नाव आहे. पती-पत्नीच्या वादात निरागस जीव संपला. दिनेशचे कुंदेगाव शिवारात शेत आहे. तो स्वतः दोरीच्या सहाय्याने तर दीड वर्षीय चिमुकला दुपट्ट्याच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. काल, २७ मे रोजी दिनेश सासरवाडीला काकनवाडा येथे गेला होता. तेथे पती-पत्नी मध्ये वाद झाला.

आज, २८ मे रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास चिमुकल्याला दिनेश  घेऊन गेला. दिनेशच्या पत्नीने सासरे पुंडलिक वानखडे यांना दूरध्वनीवरून विचारण केली असता त्यांनी अजून बापलेक घरी आले नसल्याचे  सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी दोघांचा शोध सुरू केला. सकाळी त्यांच्याच शेतात निंबाच्या झाडाला लटकलेले मृतदेह दिसले. घटनेची माहिती पातुर्डा पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तामगाव पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार श्रीकांत विखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास बीट जमादार नंदकिशोर तिवारी करत आहेत.