धक्कादायक ब्रेकिंग ! मतदार याद्यांतून वगळले 42 हजारांवर मतदार!! मेहकर, मलकापूर मतदारसंघातील कार्यवाही पूर्णत्वास

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या मतदार याद्यांतील “त्या’ मतदारांची नावे वगळण्याची खळबळजनक प्रशासकीय कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. आजअखेर जिल्ह्यातील तब्बल 42 हजार 558 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांत एकूण 20 लाख 54 हजार 384 मतदार आहेत. यापैकी 53 हजार 225 मतदारांची छायाचित्रे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या मतदार याद्यांतील “त्या’ मतदारांची नावे वगळण्याची खळबळजनक प्रशासकीय कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. आजअखेर जिल्ह्यातील तब्बल 42 हजार 558 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांत एकूण 20 लाख 54 हजार 384 मतदार आहेत. यापैकी 53 हजार 225 मतदारांची छायाचित्रे नाही वा ते नमूद केलेल्या निवासी पत्त्यावर राहतच नसल्याचे आढळले होते. वारंवार संधी देण्यात येऊनही बहुतेक मतदारांनी बीएलओ वा तहसील कार्यालयात फोटो जमा केले नाही. यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार अखेर अशा मतदारांची नावे याद्यातून वगळण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. आजअखेर 42 हजार 558 जणांची नावे वगळण्यात आली आहे. यात बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक म्हणजे 17 हजार 848 मतदारांचा समावेश आहे. एसडीओ राजेश्वर हांडे व तहसीलदार रुपेश खंडारे यांनी ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली. आता 99.43 टक्के काम पूर्ण झाले आहे. चिखली मतदारसंघातील 10 हजार 17, सिंदखेडराजा 5104, मेहकर 1559, खामगाव 2461 आणि जळगाव जामोद मतदारसंघातील 4766 मतदारांचा समावेश आहे. जवळपास 96 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांत उर्वरित नावे वगळण्याची कार्यवाही पूर्ण होणार आहे.