धक्कादायक विकृती! फारकतीसाठी बायकोचे फोटो लावले सार्वजनिक ठिकाणी!!; चिखली तालुक्यातील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संताप आणि विकृती किती खालच्या पातळीवर माणसाला नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यात समोर आले आहे. स्वतःच्या बायकोचे फोटो सार्वजनिक ठिकाणी अगदी मुत्रीघरातही एका युवकाने लावले. बायकोने घटस्फोट द्यावा म्हणून त्याने हे कृत्य केले असून, बायकोच्या बहिणी आणि आईचेही फोटो असेच लावून बदनामी करेल, अशी धमकीसुद्धा त्याने सासरच्या मंडळीला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संताप आणि विकृती किती खालच्‍या पातळीवर माणसाला नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्‍यात समोर आले आहे. स्वतःच्या बायकोचे फोटो सार्वजनिक ठिकाणी अगदी मुत्रीघरातही एका युवकाने लावले. बायकोने घटस्फोट द्यावा म्‍हणून त्याने हे कृत्य केले असून, बायकोच्या बहिणी आणि आईचेही फोटो असेच लावून बदनामी करेल, अशी धमकीसुद्धा त्‍याने सासरच्या मंडळीला दिल्याचा आरोप आहे. समाधान रामदास निकाळजे  असे या युवकाचे नाव असून, तो निमगाव गुरु (ता. देऊळगाव राजा) येथील रहिवासी आहे.

या प्रकरणी विवाहितेच्या भावाने अंढेरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी समाधानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समाधानचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी गेल्‍या वर्षी 30 जूनला झाला होता. मात्र संशयावरून तो बायकोला सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे विवाहिता दिवाळीपासून माहेरीच राहते. दरम्यान घटस्फोट मिळावा म्‍हणून समाधानने स्वतःच्या बायकोचे फोटो पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले व त्यावर गरज पडल्यास संपर्क साधावा, असे म्हणून काही मोबाइल नंबरही दिले आहेत. हे पोस्‍टर त्‍याने चिखली शहरासह अंचरवाडी रस्त्‍यावर लावले आहेत. अगदी शहरातील मुत्रीघरातही हे पोस्‍टर त्‍याने लावले. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला असता जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी बस ,रेल्वे स्टेशन सगळीकडे फोटो लावून बदनामी करतो. बायकोच्या बहिणीचे व आईचेही असेच फोटो लावतो, अशा धमक्या त्‍याने दिल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.