धक्कादायक! सातवीच्‍या मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून अश्लील फोटो टाकले!!; खामगाव तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातवीत शिकणाऱ्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंट उघडून त्यावर अश्लील फोटो व चित्रफिती अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आंबेटाकळी (ता. खामगाव) येथील 13 वर्षीय मुलगी 7 व्या वर्गात शिकते. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तिने अँड्रॉइड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  सातवीत शिकणाऱ्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंट उघडून त्यावर अश्लील फोटो व चित्रफिती अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्‍यात समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आंबेटाकळी (ता. खामगाव) येथील 13 वर्षीय मुलगी 7 व्या वर्गात शिकते. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तिने अँड्रॉइड मोबाईल घेतला होता. त्यात व्‍हॉट्‌स ॲप व्यतिरिक्त कोणतेही सोशल मीडिया अॅप्लिकेशन डाऊनलोड केलेले नाही. तरीसुद्धा तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर अश्लील फोटो टाकणे सुरू झाले.  ही बाब मुलीच्या वडिलांच्या मित्राच्या लक्षात आल्याने त्यांनी मुलीच्या वडिलांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी मुलीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये व्‍हॉट्‌स ॲप व्यतिरिक्त कोणतेही सोशल मीडिया अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यात आले नव्हते. तरीही इन्स्टग्रामवरून मुलीचे आणि मुलीच्या आईचे फोटो टाकण्यात आले होते व सोबत काही अश्लील फोटो टाकण्यात आले होते. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.