धक्‍कादायक! एका छोट्याशा खेड्यात आढळले 141 कोरोना पॉझिटिव्‍ह!!; बाधितांचा जिल्ह्याचा आकडा 17 हजारांच्‍या टप्‍प्‍यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 फेब्रुवारीला धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. एका छोट्याशा खेडेगावात तब्बल 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. झाडेगाव नावाचे हे गाव जळगाव जामोद तालुक्यात आहे. याशिवाय त्या खालोखाल बुलडाणा शहरात 62 बाधित आढळले आहेत. दरम्यान, आजच्या 416 रुग्णांसह एकूण बाधितांचा जिल्ह्याचा आकडा आता सतरा हजारांच्या टप्प्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 फेब्रुवारीला धक्‍कादायक अशी घटना समोर आली आहे. एका छोट्याशा खेडेगावात तब्‍बल 141 कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. झाडेगाव नावाचे हे गाव जळगाव जामोद तालुक्‍यात आहे. याशिवाय त्‍या खालोखाल बुलडाणा शहरात 62 बाधित आढळले आहेत. दरम्‍यान, आजच्‍या 416 रुग्‍णांसह एकूण बाधितांचा जिल्ह्याचा आकडा आता सतरा हजारांच्‍या टप्‍प्‍यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2049 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1633 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 416 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 334 व रॅपीड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 808 तर रॅपिड टेस्टमधील 825 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

जळगाव जामोद तालुका : झाडेगाव 141, आसलगाव 6, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : मूर्ती 4, थड 2, सिंदखेड 2, बुलडाणा शहर : 62, बुलडाणा तालुका : येळगाव 1, केसापूर 1, पाडळी 1, सुंदरखेड 1, देऊळघाट 2, पिंपळगाव सराई 1, सागवन 4, मेहकर तालुका : जानेफळ 1, शेगाव तालुका : जानोरी 7, चिंचोली 1, तळेगाव 1, शेगाव शहर : 31, खामगाव शहर : 7, चिखली तालुका : तांबुळवाडी 1, सावरगाव डुकरे 1, अमडापूर 1, मेरा खु 1, भालगाव 1, शेलूद 1, खैरव 1, जांभोरा 2, पळसखेड दौलत 5, पेनसावंगी 1, कव्हाळा 3, तेल्हारा 1, शेलूद 1, दहीगाव 1, मंगरूळ नवघरे 1, सोमठाणा 1, आमखेड 1, सवणा 1, चिखली शहर : 23, देऊळगाव राजा शहर : 22, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 5, डोढ्रा 2, गारगुंडी 1, किन्ही 1, देऊळगाव मही 5, लोणार तालुका : येवती 6, हिरडव 1,भानापूर 1, नायगाव 1, पिंपळनेर 1, नांद्रा 3, तांबोळा 1, सुलतानूपर 3, वेणी 1, लोणार शहर : 17, नांदुरा शहर : 1, मलकापूर शहर : 1, सिंदखेड राजा शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : किनगाव राजा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, बावनबीर 1, वरवट बकाल 1, मूळ पत्ता बीड 2, अजिंठा जि. औरंगाबाद 1, संजोळ ता. जाफराबाद जि. जालना 1, सौरभ कॉलनी अमरावती 1 येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 416 रूग्ण आढळले आहे.

136 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 136 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः खामगाव : 14, बुलडाणा : अपंग विद्यालय 37, देऊळगाव राजा : 11, जळगाव जामोद : 1, सिंदखेड राजा : 6, चिखली : 48, शेगाव : 4, लोणार : 6, मलकापूर : 7, नांदुरा : 1.

1903 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 123462 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14822 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5030 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16912 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 1903 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.