धक्‍कादायक… गेल्या 24 तासांत कोरोनाने जिल्ह्यात दर 2 तासाला एक मृत्‍यू! 858 कोरोना बाधित! 10 तालुक्यात स्फोटक स्थिती!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कडक निर्बंधांना न जुमानता कोरोनाने जिल्ह्यातील आपला धुमाकूळ कायम ठेवलाय! गत् 24 तासांत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 858 वर गेला आहे. यावर कळस म्हणजे दर 2 तासाने 1 या सरासरीने कोविडने 12 बळी घेतले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. गत् 24 तासांत कोरोनाने जिल्ह्यातील आपले …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कडक निर्बंधांना न जुमानता कोरोनाने जिल्ह्यातील आपला धुमाकूळ कायम ठेवलाय! गत्‌ 24 तासांत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 858 वर गेला आहे. यावर कळस म्हणजे दर 2 तासाने 1 या सरासरीने कोविडने 12 बळी घेतले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गत्‌ 24 तासांत कोरोनाने जिल्ह्यातील आपले हल्ले तीव्र केले आहेत. 858 पॉझिटिव्ह अन्‌ 12 जनांचे मृत्यू हे आकडेच पुरेशे बोलके अन्‌ धोक्याचा इशारा देणारे आहेत, बुलडाणा येथील महिला रुग्‍णालयातील 5 तर खामगाव सामान्य रुग्णालयातील 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अलिकडच्या  कालावधीत महिला रुग्णालयातील रोजचे मृत्यूचे आकडे काही गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहेत. दुसरीकडे 13 पैकी 10 तालुक्यांतील पॉझिटिव्ह रुग्‍णांचे वादळ काही थांबायला तयार नाहीये! विधानसभा मतदारसंघ निहाय सांगायचे झाल्यास बुलडाणा 90  व मोताळ्यात 33,  लोणार 73 तर मेहकर  52, मलकापूर 38 तर नांदुऱ्यात 80, जळगाव जामोद 48 तर संग्रामपूर 4 असे किमान अर्धशतक ते दीडशतक असा कोविडचा झंझावात आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघाचे चित्र सर्वात गंभीर असून, तेथील आकडा अडीचशेवर पोहोचलाय! 24 तासांत देऊळगाव राजा तालुक्यात 111 तर सिंदखेडराजामध्ये 139 पॉझिटिव्ह निघणे ‘पालकाची ‘ चिंता वाढविणारी बाब ठरली आहे. चिखली तालुका शतकापासून काही पाऊले अगोदर म्हणजे 96 वर थांबला.