धक्‍कादायक…!; पोलीस कर्मचाऱ्याची विष घेऊन आत्‍महत्‍या, बुलडाणा पोलीस दलात खळबळ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्याने काल, १८ ऑगस्टच्या रात्री विष घेतले. बुलडाण्यातील मेहेत्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा आज, १९ ऑगस्टला सकाळी मृत्यू झाला. संजय आनंदा मिसाळ (५५, रा. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जिल्हा पोलीस दलात ते मोटार परिवहन विभागात सहायक फौजदार …
 
धक्‍कादायक…!; पोलीस कर्मचाऱ्याची विष घेऊन आत्‍महत्‍या, बुलडाणा पोलीस दलात खळबळ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्याने काल, १८ ऑगस्‍टच्‍या रात्री विष घेतले. बुलडाण्यातील मेहेत्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्‍यांचा आज, १९ ऑगस्टला सकाळी मृत्यू झाला. संजय आनंदा मिसाळ (५५, रा. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जिल्हा पोलीस दलात ते मोटार परिवहन विभागात सहायक फौजदार म्हणून कार्यरत होते.

श्री. मिसाळ मूळचे सिनगाव जहागीर (ता. देऊळगाव राजा) येथील होते. बुलडाण्यात त्यांनी राहत्या घरी विष घेतले. त्‍यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी, १ मुलगी असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावर मूळगावी सिनगाव जहागीरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय मनमिळावू, मितभाषी आणि सर्वांवर प्रेम करणारे, प्रामाणिक म्हणून मिसाळ यांची ओळख होती. गावाकडील कोणताही व्यक्ती बुलडाण्यात कामानिमित्त आला असेल तर त्याला घरी नेऊन जेवू घातल्याशिवाय ते परत पाठवत नसत.

येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणे, गावाकडील कुणीही हॉस्पिटलला ॲडमिट असेल तर डबा पोहोचवणे, घराकडे जाणाऱ्यांना गाडीत बसवून देणे यामुळे सिनगाव वासियांना त्यांच्याबद्दल विशेष प्रेम होतेे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मूळ गावी जाऊन अनेक गोष्टी करायच्या होत्या. नुकत्याच झालेल्या बदल्यांत त्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ मिळाली होती. त्‍यांच्‍या निधनाने पोलीस दलातील सहकाऱ्यांसह सिनगाव वासियांवर दुःखाचे सावट पसरले आहे.