धक्‍कादायक… हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; रंगपंचमीच्या दिवसापासून होता बेपत्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रंगपंचमीच्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातल्या विहिरीत हात- पाय बांधलेल्या अवस्थेत काल, 1 मार्चला सायंकाळी आढळला आहे. ही धक्कादायक घटना धामणगाव देशमुख (ता. मोताळा) येथे उघडकीस आली. शांताराम पुंडलिक कारंडे (रा. धामणगाव देशमुख, ता. मोताळा) असे या युवकाचे नाव आहे. 29 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळणे झाल्यानंतर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रंगपंचमीच्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातल्या विहिरीत हात- पाय बांधलेल्या अवस्थेत काल, 1 मार्चला सायंकाळी आढळला आहे. ही धक्‍कादायक घटना धामणगाव देशमुख (ता. मोताळा) येथे उघडकीस आली. शांताराम पुंडलिक कारंडे (रा. धामणगाव देशमुख, ता. मोताळा) असे या युवकाचे नाव आहे.

29 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळणे झाल्यानंतर तो घरून बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही न सापडल्याने बोराखेडी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल 31 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास त्याचा मृतदेह स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना  दिसून आला. यावेळी त्याचे हात आणि पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनादाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून, तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.धक्‍कादायक… हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; रंगपंचमीच्या दिवसापासून होता बेपत्ता!