धत्‌ तेरे की… ‘कोरोना’ नियमांसाठी दंड वसूल करणाऱ्यांनाच बसला दंड!; जळगाव जामोद शहरातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक निर्बंध, नियम न पाळणाऱ्यांकडून जिल्हाभर स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासन कारवाई करत आहे. मात्र कारवाई करणाऱ्या पथकाकडूनच नियम भंग झाला तर?? जळगाव जामोदमध्ये एका पथकाकडून असाच प्रकार घडला तेव्हा व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या पथकाला दंड ठोठावण्यास भाग पाडले. काल, 11 मार्चच्या सायंकाळी ही घटना घडली. दंड वसूल करण्यासाठी …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक निर्बंध, नियम न पाळणाऱ्यांकडून जिल्‍हाभर स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आणि प्रशासन कारवाई करत आहे. मात्र कारवाई करणाऱ्या पथकाकडूनच नियम भंग झाला तर?? जळगाव जामोदमध्ये एका पथकाकडून असाच प्रकार घडला तेव्‍हा व्‍यापाऱ्यांनी एकत्र येऊन या पथकाला दंड ठोठावण्यास भाग पाडले. काल, 11 मार्चच्‍या सायंकाळी ही घटना घडली.

दंड वसूल करण्यासाठी तयार करण्यात आलेले पथक एकाच वाहनातून 7 ते 8 कर्मचाऱ्यांना घेऊन फिरत होते. ही बाब जळगाव जामोद येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरीत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळविले. मात्र पोलीस प्रशासन, तहसील प्रशासनाने दंड आकारण्यास असमर्थता दर्शविली. मात्र काही वेळातच शहरातील व्यापारी व मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात गोळा झाले. त्‍यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर पालिकेच्या पथकाला पालिकेकडूनच 500 रुपयांच्या दंडाची पावती फाडावी लागली. या घटनेची चर्चा कालपासून शहरभर होत आहे.