धत् तेरे की… चोरीचा हा काय नवा फंडा; खामगावातील कुटुंबाला असाही गंडा!

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुलाब जामुन बनवायचे आहेत. घरचे गॅस सिलिंडर संपले आहे. मी काकांच्या ओळखीचा आहे असे बोलून अनोळखी व्यक्तीने गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना खामगाव शहरात समोर आली आहे. याप्रकरणी काल, 7 फेब्रुवारी रोजी विजय विष्णू टिकार (रा. समता कॉलनी खामगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुलाब जामुन बनवायचे आहेत. घरचे गॅस सिलिंडर संपले आहे. मी काकांच्या ओळखीचा आहे असे बोलून अनोळखी व्यक्तीने गॅस सिलिंडर लंपास केल्याची घटना खामगाव शहरात समोर आली आहे. याप्रकरणी काल, 7 फेब्रुवारी रोजी विजय विष्णू टिकार (रा. समता कॉलनी खामगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विष्णू टिकार हे पत्नीसह बाहेरगावी गेले असताना घरी त्यांची आई आणि दोन मुले घरी होती. सकाळी 10:30 वाजता एक अनोळखी व्यक्ती घरी येऊन टिकार यांच्या आईला म्हणाला की तो काकांच्या ओळखीचा आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुलाब जामून बनवायचे आहेत. घरचे गॅस सिलिंडर संपले आहे. मी काकांशी बोललो आहे. त्यामुळे तुमचे सिलिंडर द्या, असे म्हटल्याने टिकार यांच्या आईने सिलिंडर दिले. टिकार यांचे वडील घरी आल्यानंतर तुम्ही कुणाला सिलिंडर घेऊन जायला सांगितले आहे का, असे विचारल्यावर त्यांनी नाही असे सांगितल्याने हा सगळा प्रकार बनावट असल्याचे समोर आले. या प्रकाराची तक्रार विष्णू टिकार यांनी दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.