धाडमध्ये अग्नीकल्लोळ! रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स भक्ष्यस्थानी!! 37 लाखांचे नुकसान, शॉर्ट सर्किटचा अंदाज

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील धाड येथे आज, 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तब्बल 37 लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे व्यापारी पेठ असलेल्या धाडमध्ये सकाळी एकच खळबळ व धावपळ उडाली होती. धाड- औरंगाबाद मार्गावरील पडोळ कॉम्प्लेक्समध्ये डॉ. नीलेश सोनुने यांचे क्लिनिक व सतीश सुरशे यांचे जय मातादी मेडिकल …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील धाड येथे आज, 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तब्बल 37 लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे व्यापारी पेठ असलेल्या धाडमध्ये सकाळी एकच खळबळ व धावपळ उडाली होती.

धाड- औरंगाबाद मार्गावरील पडोळ कॉम्प्लेक्समध्ये डॉ. नीलेश सोनुने यांचे क्लिनिक व सतीश सुरशे यांचे जय मातादी मेडिकल स्टोअर्स आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास या ठिकाणी आग लागली. आग लागल्याचे नागरिक जमले आणि त्‍यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्‍न सुरू केले. दुकानमालकही दुकानाकडे धावले. आगीने रुग्‍णालय व मेडिकलला वेढले होते. आग नियंत्रित होईपर्यंत या अग्निकल्लोळाने मोठे नुकसान केल्याचे तलाठी भाग 1 यांनी केलेल्या पाहणी व पंचनाम्यातून स्पष्ट झाले. आगीत रुग्णालयाचे 4 लाख 68 हजार तर मेडिकल स्टोअर्सचे 31 लाख 95 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. फर्निचर, बेड, औषधी साठा, उपकरणे, एसी, अन्य तपासणी साहित्य आदी साहित्याचा कोळसा झाल्याचे चित्र आहे.