धाडसी चोरीच्‍या इराद्यातील तिघांना मेहकरजवळ पकडले!; ‘एलसीबी’ची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाडसी चोरीच्या इराद्यातील तिघांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने काल, 25 मे रोजी मेहकरजवळ पकडले. तौसिफ अली शाह युसूफ अली शाह (27, रा. पठाणपुरा, अमरावती), शेख इरफान शेख कादर (35, रा. आझादनगर, अमरावती), सोहेल खान रहेमत खान (27, रा. धमकाटा, सोफियाननगर, अमरावती) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 1 लोखंडी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः धाडसी चोरीच्‍या इराद्यातील तिघांना बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने काल, 25 मे रोजी मेहकरजवळ पकडले.

तौसिफ अली शाह युसूफ अली शाह (27, रा. पठाणपुरा, अमरावती), शेख इरफान शेख कादर (35, रा. आझादनगर, अमरावती), सोहेल खान रहेमत खान (27, रा. धमकाटा, सोफियाननगर, अमरावती) अशी ताब्‍यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्‍यांच्‍या ताब्‍यातून 1 लोखंडी रॉड,  1 कार, 1 मोबाइल असा एकूण 4 लाख 10 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.  

चोरी  करण्याच्या उद्देशाने ते दबा धरून बसले होते. पेट्रोलिंग दरम्‍यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एलसीबीच्‍या टीमने त्‍यांच्‍यावर झडप घातली. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ अताउल्लाह, एनपीसी गजानन आहेर, लक्ष्मण कटक, भारत जंगले, युवराज मुळे, पोकाँ गजानन गोरले यांनी केली.