धाडस ग्रुपच्‍या सायकल यात्रेचे दुसरबीडमध्ये स्‍वागत

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपूर ते रायगड सायकलने निघालेल्या तरुणाईचे विचार नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर इथल्या पर्यावरण संरक्षणासाठी त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या अशा अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीचा संकल्प या सायकल यात्रेतून पूर्ण केला जात आहे. दुसरबीड येथे धाडस सायकल यात्रेचे आगमन झाले असता …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नागपूर ते रायगड सायकलने निघालेल्या तरुणाईचे विचार नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर इथल्या पर्यावरण संरक्षणासाठी त्याचबरोबर स्त्रीभ्रूण हत्या अशा अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीचा संकल्प या सायकल यात्रेतून पूर्ण केला जात आहे. दुसरबीड येथे धाडस सायकल यात्रेचे आगमन झाले असता या यात्रेचे  स्वागत करण्यात आले.

अविनाश कटरे, अनिरुद्ध सोलाट, शुभम गुंडले, निशांत निंबकर, सुमित शरणागत, राज मुन्‍ने, शरद आमनगावकर, वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर,प्रियांका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे या सर्व ध्येयाने प्रेरित असलेल्या सायकलस्वारांचे दुसरबीडकरांच्या वतीने हार पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रविण गिते, ग्रामपंचायत सदस्य वैभव देशमुख, युवा सेनेचे आविनाश चव्हाण, मेडिकल असोसिएशनचे इरफान शेख, मी वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. दिलीप चव्हाण, सचिन खंदारे, अब्बु कुलाल, आश्विन सानप, दीपक घुगे, श्री. जाधव, शेख आरिफ(बाबा), समीर कुरेशी, रमेश कोंडाने, संजय नागरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर नव्या विचाराची पेरणी करत ही यात्रा आई जिजाऊंच्या सिंदखेडराजाकडे रवाना झाली.