धामणगाव बढे, वडनेरमध्ये कोरोनाचा स्‍फोट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 एप्रिलला कोरोनाने सहा बळी घेतले असून, उपचारादरम्यान वरवंड (ता. मेहकर) येथील 86 वर्षीय पुरुष, साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील 45 वर्षीय महिला, गुम्मी (ता. बुलडाणा) येथील 44 वर्षीय महिला, बारादरी मलकापूर येथील 75 वर्षीय महिला, गोंधनापूर (ता. खामगाव) येथील 45 वर्षीय पुरुष, चिंचपूर (ता. मोताळा) येथील 69 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 एप्रिलला कोरोनाने सहा बळी घेतले असून, उपचारादरम्यान वरवंड (ता. मेहकर) येथील 86 वर्षीय पुरुष, साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील 45 वर्षीय महिला, गुम्मी (ता. बुलडाणा) येथील 44 वर्षीय महिला, बारादरी मलकापूर येथील 75 वर्षीय महिला, गोंधनापूर (ता. खामगाव) येथील 45 वर्षीय पुरुष, चिंचपूर (ता. मोताळा) येथील 69 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नवे 790 रुग्‍ण समोर आले असून, 337 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला. धामणगाव बढे (25 रुग्‍ण) आणि वडनेर (15 रुग्‍ण) येथे कोरोना विस्‍फोट झाल्‍यागत चित्र आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 7026 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 6236 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 790 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 356 व रॅविड टेस्टमधील 434 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 772 तर रॅपिड टेस्टमधील 5464 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 120, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 5, करडी 7,  डोंगरखंडाळा 1, टाकळी 1, नांद्राकोळी 4,  दुधा 2,  कुंबेफळ 4, पोखरी 1, पिंपळगाव सराई 4, सावळी 3, सव 1, येळगाव 6, सातगाव 2, कुलमखेड 2, धाड 4, सोनगाव 1, चौथा 1, सिंदखेड 3, डोमरुळ 5, रायपूर 5, गुम्‍मी 1, भडगाव 1, तांदुळवाडी 1, बोरगाव 1, वरवंड 3, पाडळी 2, उमाळा 4, ईजलापूर 1, पळसखेड भट 1, रुइखेड 6, म्हसला 5, बोरखेड 1, मोताळा शहर : 2 , मोताळा तालुका : काबरखेड 3, तरोडा 3, आडविहीर 4, वडगाव 2, आव्हा 1, तपोवन 1, पिंपळगाव देवी 7, पान्हेरा 2, चिंचपूर 3, सावरगाव 1, जयपूर 1, धामणगाव बढे 25, खामखेड 1, लिहा 1, पिंपळगाव गवळी 1, घानेगाव 1, हनवतखेड 1, लपाली 2, ब्राह्मांदा 3, भोरतेक 1, सारोळा 2, फर्दापूर 1, दिडोळा 1, महाल पिंप्री 1, मूर्ती 1, कोथळी 1, माकोडी 3, पुन्हई 1, दाभाडी 10, निपाना 1, किन्होळा 6, खरबडी 1, अंतरी 1, दहिगाव 2, खामगाव शहर : 34, खामगाव तालुका :  गारडगाव 2, पळशी 1, बोथा 1, आंबेटाकळी 1, दुधा 1, सुटाळा 1, राहुड 1, मांडका 1, पिंप्राळा 1, शिरसगाव 1, शेगाव शहर : 46, शेगाव तालुका : खेर्डा 1, आळसणा 1, गौलखेड 8, जानोरी 1, पहूरजिरा 1, गायगाव 1, येऊलखेड 1, तरोडा 1, चिखली शहर : 14, चिखली तालुका : दहिगाव 1, अमडापूर 4, साकेगाव 1, मेरा खुर्द 1, भालगाव 1, मंगरूळ नवघरे 2, कोलारा 1, अंत्री कोळी 1, येवता 1, मेरा बुद्रूक 6, अंत्री खेडेकर 4,  अमोना 6, चंदनपूर 2, धोडप 1, भोरसा भोरसी 2,  शेळगाव आटोळ 6, असोला 2, खोर 1, पेठ 1, गिरोला 2, मालगणी 1, वरखेड 1, बेराळा 1, मलकापूर शहर : 17, मलकापूर तालुका : धरणगाव 1, माकनेर 2, लोनवडी 1, जांबुळधाबा 1, मोरखेड 2, उमाळी 4, निमखेड 1,   देऊळगाव राजा शहर : 3, देऊळगाव राजा तालुका : उंबरखेड 1,  खैरव 1, गारखेड 1, टाकरखेड वायाळ 1, देऊळगाव मही 3, अंढेरा 1, कुंभारी 1, जवळखेड 1, सावखेड तेजन 1, सातेगाव 1, गव्हाण 2, मंडपगाव 1, नारायणखेड 1, सुरा 1, गुंजाळा 1, सिंदखेड राजा शहर : 16, सिंदखेड राजा तालुका : दरेगाव 9,  पिंपरखेड 1, साखरखेर्डा 2, रताळी 1, रुमना 1, दुसरबीड 1, हिवरखेड 1, जागदरी 1, महरखेड 1, शेंदुर्जन 1, मेहकर शहर : 22, मेहकर तालुका : शेंदला 1, चिंचोली बोरे 1, गजरखेड 1, वडगाव माळी 2, मोळी 1, मोहना 2, भालेगाव 3, खानापूर 1, धोडप 1, कळमेश्वर 2, परतापूर 1, मेटसाना 1, डोणगाव 1, बेलगाव 1,लोणी गवळी 1, अंजनी 1, जनेफळ 2, पिंपरी माळी 3, देऊळगाव माळी 4,  संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : वरवट 2, बोरखेड 1, जळगाव जामोद शहर :11, जळगाव जामोद तालुका : काजेगाव 1, आडोळ 3,  पिंपळगाव काळे 7, इस्लामपूर 5,  सुलज 1, वडगाव पाटण 2, पळशी सुपो 1, धानोरा 2, भेंडवळ 2, मडाखेड 1, लिंगा टपरी 1, आसलगाव 1, बोरडा 1, निंभोरा 1, तिवडी 1, गाडेगाव 2, सावरगाव 1, नांदुरा शहर :4, नांदुरा तालुका : पिंपळखुटा 1, इसापूर 1, टाकळी 2, हिंगणे गव्हाड 3,  तरवाडी 4,  वडनेर 15,  धानोरा 2,  टाकरखेड 8, डिघी 1, पि. आढाव 6, मालेगाव 1, फुली 3, निमगाव 1, लोणार शहर : 19, लोणार तालुका : तांबोळा 1, जांभूळ 1, चिखला 2, बिबी 8, सावरगाव तेली 1, मातमळ 1, पर्डी 1, बिबखेड 1, चिंचोली 1, हिरडव 2, कोयाळी 11, वल्हार 1, सुलतानपूर 2, पिंपळ खूटा 1, देऊळगाव वायासा 1, खुरमपूर 1, चोरपांगरा 1, परजिल्हा वालसावंगी 1, पारध 5, नागपुर 4, चंद्रपूर 3, पुणे 1, लोणी 1

कोरोनाबाधितांचा आकडा 53963 वर

आज 337 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 308673 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 46614 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 6248 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 53963 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयात 7008 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 341 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.