धार्मिक स्थळाची विटंबना; दारूड्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेंदुर्जन येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेंदुर्जन येथील धार्मिक स्थळाची विटंबना करणार्याविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय रघुनाथ मानवतकर (24, रा. शेंदुर्जन) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आरोपीची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारार्थ सिंदखेडराजा येथील दवाखान्यात भरती करण्यात आले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास शेंदुर्जन- राजेगाव रोडवरील एका धार्मिक स्थळाची विटंबना झाल्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेंदुर्जन येथील धार्मिक स्थळाची विटंबना करणार्‍याविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय रघुनाथ मानवतकर (24, रा. शेंदुर्जन) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आरोपीची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारार्थ सिंदखेडराजा येथील दवाखान्यात भरती करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास शेंदुर्जन- राजेगाव रोडवरील एका धार्मिक स्थळाची विटंबना झाल्याची माहिती गावकर्‍यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला दारूचे व्यसन असून, नशेतच त्याने धार्मिक स्थळारील कपडे अंगावर घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आज उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार श्री. आटोळे यांनी गावात भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.