धोडपमध्ये कालची रात्र चोरट्यांची… गच्चीवर झोपणे ग्रामस्‍थांना पडले महागात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः धोडपमध्ये (ता. चिखली) कालची रात्र जणू चोरट्यांचीच होती. उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्यांची तीन घरे चोरट्यांनी फोडली. 46 हजार रुपयांचा माल चोरी गेला आहे. आज, 20 मे रोजी सकाळी या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भरत तुळशिराम कोल्हे (52, रा. धोडप) हे काल, 19 मेच्या रात्री …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः धोडपमध्ये (ता. चिखली) कालची रात्र जणू चोरट्यांचीच होती. उकाड्यामुळे घराच्‍या गच्‍चीवर झोपायला गेलेल्यांची तीन घरे चोरट्यांनी फोडली. 46 हजार रुपयांचा माल चोरी गेला आहे. आज, 20 मे रोजी सकाळी या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

भरत तुळशिराम कोल्हे (52, रा. धोडप) हे काल, 19 मेच्‍या रात्री साडेनऊला जेवण करून पत्नी सौ. अरुणा यांच्‍यासह गच्चीवर झोपायला गेले. त्‍यांचा मुलगा मदन त्‍याच्‍या पत्‍नीसह बेडरूममध्ये झोपला होता. पहाटे पाचला मदनने त्‍यांना फोन करून सांगितले की, बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावलेला आहे. त्‍यामुळे भरत कोल्‍हे तातडीने खाली आले आणि दरवाजा उघडला. घरामधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले त्‍यांना दिसले. घरातील पत्राची कोठी व पेटी दिसली नाही. त्‍यामुळे घरात चोरी झाल्याचे त्‍यांना लक्षात आले. घरामागील दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. 100 मीटरवर शेतात पेटी व कोठी दिसली. त्यातील कपडे व सामान बाहेर पडलेले दिसले. त्यातील नगदी पैसे 20 हजार रुपये व अंदाजे 1 तोळ्याची गहू मण्याची पोत (किंमत 20000), लहान मुलाचे चांदीचे कडे (किम 2000) असे चोरट्याने नेल्याचे दिसून आले. याचदरम्‍यान गावामधील पंजाबराव शिवाजी कोल्हे यांचेही घर फोडून नगदी 1500 रुपये व सुदाम हरिभाउ कोल्हे यांचे घर फोडून 2000 रुपये चोरून नेले. ज्ञानदेव महादेव खरात यांची जुनी कमांडो कंपनीची लाल रंगाची बॅटरी (किंमत 500) सुद्धा  चोरट्यांनी नेल्याचे समोर आले. भरत कोल्हे यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

ते मध्यरात्री अडीचला लघुशंकेला उठले अन्‌….

रायपूर पोलीस ठाण्याच्‍या हद्दीतील घाटनांद्रा येथे चोरीची घटना समोर आली आहे. आज, 20 मे रोजी पहाटे अडीचला नंदकिशोर ज्ञानदेव कन्नर हे लघुशंकेला उठले असता त्‍यांना घरातील 20 हजार रुपयांचे 3 मोबाइल लंपास झाल्याचे दिसले. त्‍यांनी रायपूर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे.