नको त्‍या गोष्टी पाहण्यात पुणे, नागपूर, नाशिककर पुढे!

मुंबई : पुरोगामित्त्वाचा आणि सांस्कृतिकतेचा वसा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक पाॅर्न फिल्म पाहिल्या जातात. एका सर्वेक्षणानुसार हे हे पुढे आले आहे. त्यातही महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत सर्वांत जास्त पाॅर्न फिल्म पाहिल्या जातात, असं हा अहवाल सांगतो. पाॅर्न साईटस्वर देशात तीन वर्षांपासून बंदी आहे. तरीही चोरून पाॅर्न फिल्म पाहिल्या जातात. साडेआठशे पाॅर्न ,साईटस्वर बंदी असली, तरी पाॅर्न फिल्म …
 

मुंबई : पुरोगामित्त्वाचा आणि सांस्कृतिकतेचा वसा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक पाॅर्न फिल्म पाहिल्या जातात. एका सर्वेक्षणानुसार हे हे पुढे आले आहे. त्यातही महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत सर्वांत जास्त पाॅर्न फिल्म पाहिल्या जातात, असं हा अहवाल सांगतो.

पाॅर्न साईटस्‌वर देशात तीन वर्षांपासून बंदी आहे. तरीही चोरून पाॅर्न फिल्म पाहिल्या जातात. साडेआठशे पाॅर्न ,साईटस्‌वर बंदी असली, तरी पाॅर्न फिल्म पाहणं काही कमी होत नाही. उलट वाढतंच आहे. महाराष्ट्रात पॉर्न साइट पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गुगल पॉर्न सर्चिंगमध्ये पुणे, नाशिक आणि नागपूर हे जिल्हे आघाडीवर आहेत.

पुण्याचा पॉर्न साइट पाहण्यात पहिला क्रमांक लागतो. नाशिक दुसऱ्या क्रमांकावर, तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्लील फिल्म पाहणाऱ्यांची तसेच पॉर्न साइट्सना भेट देणाऱ्यांची संख्या चौपट वाढली आहे. शाळा-महाविद्यालयीन मुले आणि मुली, महिला आणि वृद्ध अशा सगळ्यांचा आंबन शाैकिनांत समावेश आहे. उपराजधानीत पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सायबर पोलिसांचं आता अशा साईटस्‌ पाहणाऱ्यांवर बारकाईनं लक्ष असेल.