नगरपालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची बदली, स्वजिल्ह्यात परतले; बुलडाण्यात गणेश पांडे यांची नियुक्‍ती

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा नगरपालिकेचे कर्तबगार मुख्याधिकारी म्हणून गणना झालेले आणि कोरोना योद्धा अशी ओळख निर्माण करणारे महेश वाघमोडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रिसोड पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे बदलून आले आहेत. राज्य शासनाच्या २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला. यामुळे प्रसाशकीय वर्तुळात …
 
नगरपालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची बदली, स्वजिल्ह्यात परतले; बुलडाण्यात गणेश पांडे यांची नियुक्‍ती

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा नगरपालिकेचे कर्तबगार मुख्याधिकारी म्हणून गणना झालेले आणि कोरोना योद्धा अशी ओळख निर्माण करणारे महेश वाघमोडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रिसोड पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे बदलून आले आहेत.

राज्य शासनाच्या २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला. यामुळे प्रसाशकीय वर्तुळात सध्या बदल्यांचा माहौल आहे. नुकतेच महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाल्यावर आता नगरविकास विभागाच्या बदल्यांना प्रारंभ झाला. बुलडाणा पालिकेचे मुख्याध्याकारी महेश वाघमोडे यांना बुलडाण्यात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाल्याने त्यांची प्रसाशकीय बदली होणे क्रमप्राप्त ठरले. मागील आठवड्यापासून तशी चर्चाही सुरू झाली, ही चर्चा अखेर आज खरी ठरली. नगरविकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या स्वाक्षरीने आज बदल्यांचे आदेश जारी झाले.

महेश वाघमोडे यांची आपल्या मूळ सांगली जिल्ह्यातील जत पालिकेचे सीओ म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी रिसोड (जिल्हा वाशिम) येथील गणेश रामचंद्र पांडे हे बदलून येत आहेत. आज वाघमोडे यांना कर्मचाऱ्यांतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. आपल्या सुमारे साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात श्री. वाघमोडे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची किमया केली. कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी जबरदस्त व कौतुकास्पद ठरली. कोविड उपाययोजना, कंटेंटमेंट झोन, रुग्णाचे अंतिम संस्कार, दंडात्मक कारवाई अशा चौफेर कामगिरीने ते खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा ठरले.