नदीच्या काठावरील दारूचा कारखाना उद्‌ध्वस्त; हिवरखेडच्या पोलिसांची कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नदीच्या काठावर असलेला गावरान दारूचा कारखाना हिवरखेड पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही कारवाई खामगाव तालुक्यातील कोंटी शिवारातील नदीच्या काठावर आज, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली.दाट जंगलात गोवर्धन दशरथ इंगळे (३६), सागर फकिरा धुरंदर (४०, दोघे रा. वर्णा, ता. खामगाव) यांनी गावरान दारू बनवण्याचा धंदा सुरू …
 
नदीच्या काठावरील दारूचा कारखाना उद्‌ध्वस्त; हिवरखेडच्या पोलिसांची कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नदीच्या काठावर असलेला गावरान दारूचा कारखाना हिवरखेड पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. ही कारवाई खामगाव तालुक्यातील कोंटी शिवारातील नदीच्या काठावर आज, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली.
दाट जंगलात गोवर्धन दशरथ इंगळे (३६), सागर फकिरा धुरंदर (४०, दोघे रा. वर्णा, ता. खामगाव) यांनी गावरान दारू बनवण्याचा धंदा सुरू केला होता. पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून ही माहिती होती. हिवरखेड पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार गजानन वाघ यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ठाणेदारांच्या सूचनेवरून बिट अंमलदार गजानन आहेर, पोकाँ प्रदीप मोरे, होमगार्ड सतीष पांढरे व महादेव वानखेडे यांनी अचानक छापा मारून कारवाई केली. यावेळी तब्बल ५० लिटर हातभट्टी दारू व ४०० लिटर मोहसडवा (किंमत ८० हजार रुपये) पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. दोन मोटारसायकली व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवर्धन व सागरला अटक केली आहे.