नमाज पडण्यासाठी जातो म्हणाला अन्…

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील सिद्धिकीनगरातून इलियाज अलीखान रियाज अलीखान (23) हा तरुण 17 जानेवारीच्या संध्याकाळी 6 पासून गायब आहे. नमाज पडण्यासाठी जातो असे सांगून तो घरून निघून गेला. त्याच्याजवळ त्याचे आधारकार्ड सुध्दा आहे. त्याचा रंग गोरा असून बांधा सडपातळ, उंची 165 सें.मी., पायात साधी चपल, अंगात गुलाबी शर्ट, पँट …
 

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील सिद्धिकीनगरातून इलियाज अलीखान रियाज अलीखान (23) हा तरुण 17 जानेवारीच्या संध्याकाळी 6 पासून गायब आहे. नमाज पडण्यासाठी जातो असे सांगून तो घरून निघून गेला. त्याच्याजवळ त्याचे आधारकार्ड सुध्दा आहे. त्याचा रंग गोरा असून बांधा सडपातळ, उंची 165 सें.मी., पायात साधी चपल, अंगात गुलाबी शर्ट, पँट घातलेली आहे. परिसरात शोध घेतला असता मिळून आला नाही. याप्रकरणी त्याचे वडील रियाज अलीखान दुराणी अलिखान (64) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या वर्णनाची व्यक्ती सापडल्यास संपर्क करावा, असे आवाहन नांदुरा पोलिसांनी केले आहे.