नमुने संकलन, चाचण्यांमध्ये वाढ! पेशंटही वाढले!! आज पॉझिटिव्‍ह रुग्‍णांचा आकडा 427 पार!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा लाईव्ह ने ‘आरोग्य यंत्रणा संडे मूडमध्ये , नमुने व चाचण्यांचा वेग मंदावला’ या शीर्षकाखाली प्रसारित वृत्ताची आरोग्य यंत्रणांनी गंभीर दखल घेतल्याने सोमवारी, 1 मार्चला स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांची गती वाढल्याचे दिसून आले. परिणामी रुग्णसंख्येने थेट सव्वा चारशेचा आकडा पार केलाय! यामुळे गत् 24 तासांत जिल्ह्यात 427 कोरोना पॉझिटिव्ह आढळून …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा लाईव्ह ने ‘आरोग्य यंत्रणा संडे मूडमध्ये , नमुने व चाचण्यांचा वेग मंदावला’ या शीर्षकाखाली प्रसारित वृत्ताची आरोग्य यंत्रणांनी गंभीर दखल घेतल्याने सोमवारी, 1 मार्चला स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांची गती वाढल्याचे दिसून आले. परिणामी रुग्णसंख्येने थेट सव्वा चारशेचा आकडा पार केलाय! यामुळे गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 427 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामुळे कोरोनाच्या धोक्याची पातळी किती गंभीर आहे हे पुन्हा दिसून आले आहे.
यंत्रणांनी आरटीपीसीआर, ट्राउंट व रॅपिड मिळून 2537 स्वॅब नमुने संकलित केले. यासह मागील काही प्रलंबित मिळून 3203 अहवाल प्राप्त झाले. यातील तब्बल 427 जण कोरोना बाधित असल्याचे आढळले. याचा बाधित दर (13.33 टक्के) पुन्हा वाढल्याचे दिसून आले. या तुलनेत 2739 अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. याउप्परही अजूनही 8669 अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.

खामगाव, चिखली, बुलडाण्यातील थैमान कायम!
दरम्यान, सलग दुसऱ्या आठवड्यातही 3 तालुक्यांतील कोरोनाचे थैमान कायम आहे. खामगाव 80, बुलडाणा 73, चिखली 53 या तालुक्यांतील आकडेवारी धोकादायक ठरावी अशीच आहे. देऊळगाव राजा 41, नांदुरा 44 येथील प्रकोप कायम असून, मलकापूर 22, जळगाव जामोद 23, शेगाव 22, सिंदखेडराजा 16, मोताळा 14, संग्रामपूर 11मधील कोविड चा मुक्काम कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.