नर्सरीतून १ हजार झाडे आणली, एकालाही पपई लगडली नाही!; खामगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकट

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नर्सरीतून आणलेल्या १ हजार रोपट्यांपैकी एकाही झाडाला पपईचे फळ लगडले नसल्याची तक्रार विहिगाव (ता. खामगाव) येथील शेतकरी गजानन सदाशिव त्रिकाळ यांनी केली आहे. त्यांच्या अन्य दीड एकरातील पपईला फळे आहेत, मात्र नर्सरीतून आणलेल्या झाडांनाच नाहीत, असा आरोप त्यांनी केला असून, नर्सरीमालकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. नायगाव (ता. …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नर्सरीतून आणलेल्या १ हजार रोपट्यांपैकी एकाही झाडाला पपईचे फळ लगडले नसल्याची तक्रार विहिगाव (ता. खामगाव) येथील शेतकरी गजानन सदाशिव त्रिकाळ यांनी केली आहे. त्‍यांच्‍या अन्य दीड एकरातील पपईला फळे आहेत, मात्र नर्सरीतून आणलेल्या झाडांनाच नाहीत, असा आरोप त्‍यांनी केला असून, नर्सरीमालकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

नायगाव (ता. बुलडाणा) येथील इंगळे हायटेक नर्सरीतून यांनी गेल्‍या डिसेंबरमध्ये १ हजार पपईचे रोपटे २५ रुपये नगाप्रमाणे आणली होती. रोपट्यांसाठी २५ हजार रुपये व इतर लागवड खर्च ५० हजार असा आजवर त्‍यांचा ७५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र सात महिने उलटून गेले तरी पपईला फळच लगडलेले नाही. श्री. त्रिकाळ यांनी दीड एकरात पपई लावलेली आहे, त्‍या झाडांना मात्र व्यवस्थित फळे लागलेली आहेत. मात्र इंगळे यांच्या नर्सरीमधून आणलेल्‍या १ हजार पपईच्‍या झाडांना फळे नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांचे सव्वा एकरात झालेले नर्सरीवाल्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकरी त्रिकाळ यांनी केली आहे.