नळाचे पाणी भरताना विवाहितेचा शॉक लागून मृत्‍यू; मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नळाचे पाणी भरताना विजेचा धक्का बसून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना आज, २३ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घिर्णी (ता. मलकापूर) येथे घडली. रुपाली श्रीनाथ सुशिर असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पाणी भरताना तिचा हात खंडलेल्या वायरला लागला. त्यामुळे जोरदार विजेचा धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला. तिला …
 
नळाचे पाणी भरताना विवाहितेचा शॉक लागून मृत्‍यू; मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नळाचे पाणी भरताना विजेचा धक्का बसून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्‍यू झाला. ही घटना आज, २३ सप्‍टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घिर्णी (ता. मलकापूर) येथे घडली.

रुपाली श्रीनाथ सुशिर असे मृत्‍यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पाणी भरताना तिचा हात खंडलेल्या वायरला लागला. त्‍यामुळे जोरदार विजेचा धक्का बसून तिचा जागीच मृत्‍यू झाला. तिला मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. प्राथमिक तपास पीएसआय श्री. ठाकरे यांनी करून अधिक तपास एएसआय श्री. रोकडे करत आहेत.