नवरात्रोत्‍सव ः नव्‍या “एसडीपीओं’नी दिल्या या सूचना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या उपस्थितीत बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक पार पडली. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी श्री. कदम यांनी केले. मागील वर्षी प्रमाणेच याहीवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करावा. …
 
नवरात्रोत्‍सव ः नव्‍या “एसडीपीओं’नी दिल्या या सूचना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या उपस्थितीत बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक पार पडली. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी श्री. कदम यांनी केले.

मागील वर्षी प्रमाणेच याहीवर्षी अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करावा. कोरोना अजूनही पूर्णपणे पराभूत झाला नसल्याने कोरोनाला हरविण्याची जबाबदारी आपली आहे. यावर्षी नियमांचे पालन केले तर पुढील वर्षी सण उत्सव आनंदात साजरा करता येतील, असेही श्री. कदम म्हणाले. रस्त्याच्या बाजूला असलेली आरास, मोठे मंडप डेकोरेशन न करता लहान मूर्तीची स्थापना करावी.

भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये. घटस्थापना व विसर्जनाच्या दिवशी ढोल- ताशा व इतर कोणतेही वाद्ये वाजवू नये, असे आवाहन ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी केले. यावेळी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सदानंद सोनकांबळे, बुलडाणा उपविभागातील पोलीस पाटील, शहरातील सामाजिक कार्यकर्ते व दुर्गोत्‍सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.