नवरा प्रेयसीसोबत फिरायचा; सासऱ्याची लगट, म्हणायचा, ‘मै हूँ ना…’, देऊळगाव राजा पोलिसांनी केला ५ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, प्रेयसीही गोत्‍यात!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बांधकाम ठेकेदार असलेला नवरा दुसरीसोबत फिरायचा. बायकोचा छळ करून मारहाण करायचा. सासऱ्याने तर हद्द केली. “तुझा नवरा तुला वागवत नसेल तर मी सांभाळतो’ असे अश्लील बोलायचा. माहेरावरून ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावायचा, अशी तक्रार ३१ वर्षीय विवाहितेने देऊळगावराजा पोलीस ठाण्यात काल, ३ सप्टेंबर रोजी दिली. तक्रारीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा …
 
नवरा प्रेयसीसोबत फिरायचा; सासऱ्याची लगट, म्हणायचा, ‘मै हूँ ना…’, देऊळगाव राजा पोलिसांनी केला ५ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, प्रेयसीही गोत्‍यात!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बांधकाम ठेकेदार असलेला नवरा दुसरीसोबत फिरायचा. बायकोचा छळ करून मारहाण करायचा. सासऱ्याने तर हद्द केली. “तुझा नवरा तुला वागवत नसेल तर मी सांभाळतो’ असे अश्लील बोलायचा. माहेरावरून ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावायचा, अशी तक्रार ३१ वर्षीय विवाहितेने देऊळगावराजा पोलीस ठाण्यात काल, ३ सप्टेंबर रोजी दिली. तक्रारीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलमखाँ येथे माहेरी आलेल्या वैशाली दीपक कांबळे या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह जालना येथील बांधकाम ठेकेदार असलेल्‍या दीपक रोबन कांबळे (३५) याच्यासोबत २०११ साली झाला होता. सुरुवातीचे ४ महिने चांगले वागविल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. लग्न आमच्या हौसेप्रमाणे केले नाही, असे टोमणे देत तिला मारहाण करण्यात येत होती. तिला त्रास व्हावा म्हणून घरातील कठीण कामे करून घेण्यात येत होती. तिला दोन दोन दिवस उपाशी ठेवण्यात येत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. तिचा नवरा दीपकचे एका हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या रोजी मारीस डायस (३४) हिच्यासोबत अफेअर होते.

तो रोजीला घरी घेऊन यायचा. पतीच्या संबंधाबाबत सासऱ्याला माहीत केले असता तो सांभाळत नसेल तर मी सांभाळतो, असे म्हणून सासऱ्याने तिला अपमानित केले. मोटारसायकल आणण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आण, अशी मागणी सासरचे लोक करत होते. वैशालीने नकार दिला असता तिच्या अंगावरील सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, कानातले दागिने काढून घेत तिला लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली व घराबाहेर हाकलले. त्यामुळे वैशाली माहेरी आली. १ सप्टेंबर रोजी तिचा पती व सासरा पिपळगाव चिलमखाँ येथे आले.

शिविगाळ करत पुन्‍हा वैशालीला लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी सोडविले, असे वैशालीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पती दीपक रोबेन कांबळे, सासरा रोबेन डेव्हिड कांबळे, सासू कमलाबाई रोबेन कांबळे, नणंद नीता रोबेन कांबळे व नवऱ्याची प्रेयसी रोजी मारीस डायस (सर्व रा. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.