नवऱ्यानेही सोडले, ज्याच्यासोबत पळून गेली त्या प्रियकरानेही दिला धोका; 24 वर्षीय तरुणीवर कोसळलं आभाळ!; 20 वर्षीय प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा; लोणार तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तिच्यापेक्षा तो तीन वर्षांनी लहान, तिच्या लहान भावाचा मित्र… त्यामुळे तिच्या घरी त्याचे येणे जाणे होते. त्यातून मैत्री झाली, नंतर दोघांत प्रेम फुलले. प्रेमाला कसले आले वयाचे बंधन… असे म्हणत दोघांनी “भरभरून’ प्रेम करायला सुरुवात केली. मात्र तिच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध झाला. त्यांनी तिचे 2019 ला लग्न दुसरीकडे उरकून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तिच्यापेक्षा तो तीन वर्षांनी लहान, तिच्या लहान भावाचा मित्र… त्यामुळे तिच्या घरी त्याचे येणे जाणे होते. त्‍यातून मैत्री झाली, नंतर दोघांत प्रेम फुलले. प्रेमाला कसले आले वयाचे बंधन… असे म्हणत दोघांनी “भरभरून’ प्रेम करायला सुरुवात केली. मात्र तिच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध झाला. त्‍यांनी तिचे 2019 ला लग्न दुसरीकडे उरकून टाकले. तीन महिनेच ती नवऱ्याच्या घरी राहिली. तिच्या प्रियकराने नवऱ्याला त्यांच्या संबंधाबाबत सांगितले. फोटो पाठविले, ती माझी आहे… तू तिला सोडून दे… असे सांगितले. बायकोची ही लव्‍हस्टोरी एेकून त्‍याचाही संताप अनावर झाला. त्‍याने लगेच तिला माहेरी आणून सोडले. नंतर तीन महिन्यांपूर्वी ती प्रियकरासोबत पळून गेली. त्याच्या घरी राहिली. त्‍याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. मात्र लग्‍न दूरच, पण तिचा शारीरिक आणि मानसिक छळ त्‍याने सुरू केला. त्‍याने तिला घराबाहेर हाकलले. पती घराबाहेर काढले, प्रियकरानेही हाकलले… त्‍यामुळे ती हवालदील झाली. तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि प्रियकराविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तिचा छळ करणारे प्रियकराच्‍या घरातील इतर 6 जण मात्र फरारी आहेत. लोणार तालुक्यातील खुरमपूर येथे हा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपी दीपक विनोद राठोड (21) याचे शिलासोबत (काल्पनिक नाव) 2017 पासून प्रेमसंबंध होते. तो तिच्या लहान भावाचा मित्र असल्याने त्याचे शिलाच्या घरी नेहमी येणेजाणे होते. यातूनच शिला आणि दीपकची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. शिलाच्या घरच्यांना मात्र दोघांच्या संबंधाबाबत कळताच विरोध सुरू झाला. त्यामुळे शिलाचे अंढेरा येथील एका तरुणासोबत 14 मे 2019 रोजी लग्न लावून देण्यात आले. शिलासोबत लग्न होऊ शकले नाही म्हणून दीपकने तिच्या नवीन संसारात विष कालवण्याचा निर्णय घेतला. त्याने शिलाच्या नवऱ्याला दोघांच्या संबंधाबाबत सांगितले. काही फोटो पाठवले. शिला सिर्फ मेरी हैं… असे म्हणत तिला सोडून द्यायला सांगितले. त्‍यामुळे अवघ्या तीनच महिन्यांत शिलाच्या नवऱ्याने तिला कायमचे माहेरी पाठवून दिले. ती माहेरी आल्यानंतर दीपक पुन्हा तिला भेटायचा प्रयत्न करू लागला. दोघांचे पुन्हा सूत जुळले. दीपकने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्‍याच्या वचनाला बळी पडून तिने 3 मार्च 2021 रोजी दीपकसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. दीपकच्या घरच्यांनी बोलावून घेतल्याने गेल्या 3 महिन्‍यांपासून ती दीपकच्या घरीच रािहली.

मुलगी पळून गेल्याने शिलाच्या घरचे मात्र प्रचंड संतप्त झाले होते. काहीच दिवसांत दीपक व दीपकच्या घरच्यांनाही शिला नकोशी झाली. त्‍यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. लग्नाबाबत विचारल्यावर तो तिला टाळू लागला. अनेकदा तिला घरातून बाहेर काढून देण्याचे प्रयत्न झाले. काल, 13 जून रोजी रात्रीदरम्यान तिला दीपकने घराबाहेर काढले. वडील स्वीकारायला तयार नाहीत, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेही घात केला अशा अवस्थेत तिनेच रात्रीच लोणार पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपकच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दीपकला अटकही केली. दीपकच्या घरच्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले. दीपकच्या घरचे मात्र सध्या फरार आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशा अवस्थेत आयुष्याची हेळसांड होत असलेल्या शिलाला मात्र प्रश्न पडलाय आता भविष्याचे काय? प्रेमाने अंध होऊन नको ते पाऊल उचलणाऱ्या नव्या पिढीने या घटनेतून नक्‍कीच काहीतरी शिकले पाहिजेत. याप्रकरणी लोणार पोलीस पुढील तपास करीत आहेत.