नवऱ्याने उंदीर मारण्याचे औषध पाजले होते; पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीने उंदीर मारण्याचे औषध पाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विवाहितेचा आज, २३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. प्रियांका संदीप दाभाडे (२६, रा. शिरवा, ता. मोताळा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ९ सप्टेंबर रोजी प्रियांका माहेरवरून शिरवा येथे आली होती. त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत भांडण केले व …
 
नवऱ्याने उंदीर मारण्याचे औषध पाजले होते; पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीने उंदीर मारण्याचे औषध पाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विवाहितेचा आज, २३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. प्रियांका संदीप दाभाडे (२६, रा. शिरवा, ता. मोताळा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

९ सप्टेंबर रोजी प्रियांका माहेरवरून शिरवा येथे आली होती. त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत भांडण केले व उंदीर मारण्याचे औषध तिला पाजले होते. दवाखान्यात न आणता तू नाटक करत असल्याचे म्हटले होते. प्रियांकाच्या आई- वडिलांना माहिती मिळताच त्‍यांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी संदीप रामधन दाभाडे (३०, रा. शिरवा, ता. मोताळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.