“नवऱ्यासोबत काय राहतेस, दोघे पळून जाऊ…’; पाठलाग करून विवाहितेची काढली छेड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी जवळीक साधण्याचा प्रयत्न, त्यात अपयश आल्याने रस्त्याने तिचा पाठलाग करून ३८ वर्षीय विवाहितेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव शहरातील टिपू सुलतान चौकात २३ सप्टेंबरला दुपारी घडला. या प्रकरणी काल, २४ सप्टेंबरला सायंकाळी विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद यामिन मोहम्मद यासीन …
 
“नवऱ्यासोबत काय राहतेस, दोघे पळून जाऊ…’; पाठलाग करून विवाहितेची काढली छेड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी जवळीक साधण्याचा प्रयत्‍न, त्‍यात अपयश आल्याने रस्‍त्‍याने तिचा पाठलाग करून ३८ वर्षीय विवाहितेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव शहरातील टिपू सुलतान चौकात २३ सप्‍टेंबरला दुपारी घडला. या प्रकरणी काल, २४ सप्‍टेंबरला सायंकाळी विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

मोहम्मद यामिन मोहम्मद यासीन (रा. टिपू सुलतान चौक, शेगाव) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडितेच्या घराजवळ राहतो. मागील काही दिवसांपासून तो तिच्‍याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. रस्त्याने जात असताना तिचा पाठलाग करून वाईट उद्देशाने त्‍याने तिला थांबवले. “तुझ्या नवऱ्यासोबत काय राहतेस, आपण दोघे पळून जाऊ’ असे तो म्हणाला. त्‍यामुळे विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोहेकाँ मुरलीधर वानखडे करत आहेत.