नववधूचा शारीरिक संबंधास नकार; पतीनं उचललं हे पाऊल…

रतलाम : पूर्वी लग्नानंतर पूजा होईपर्यंत नवदाम्पत्याला शारीरिक संबंधास परवानगी नव्हती. त्याचे कारण मधले १६ दिवस नवदाम्पत्य परस्परांना समजून घेई; परंतु अलीकडे फिल्मी दुनिया आणि मालिकांच्या नादी लागून विवाहानंतर लगेच सुहाग रात करण्याची टूम निघाली आहे. विवाहाअगोदरह डेटिंगच्या नावाखाली शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात आहेत; परंतु देशातील काही भाग आणि मुली अशा असतात, की विवाहानंतर …
 

रतलाम : पूर्वी लग्नानंतर पूजा होईपर्यंत नवदाम्‍पत्याला शारीरिक संबंधास परवानगी नव्हती. त्याचे कारण मधले १६ दिवस नवदाम्‍पत्य परस्परांना समजून घेई; परंतु अलीकडे फिल्मी दुनिया आणि मालिकांच्या नादी लागून विवाहानंतर लगेच सुहाग रात करण्याची टूम निघाली आहे. विवाहाअगोदरह डेटिंगच्या नावाखाली शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात आहेत; परंतु देशातील काही भाग आणि मुली अशा असतात, की विवाहानंतर लगेच शारीरिक संबंध ठेवायला तयार होत नाहीत. नकार पचविण्याची सवय नसली, की काय होते, हे रतलाममधील घटनेवरून स्पष्ट होते.

लग्नानंतर नवदाम्‍पत्याच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार असते. यात मोठी परीक्षा असते ती नववधूची. तिला नवीन कुटुंबात जाऊन नवीन लोक, नवीन चालीरितींना समजून घ्यायच्या असतात. लग्न हा क्षण जितका नववधूसाठी जितका आनंदाचा, तितकाच नंतरचा काळ कसोटीचा असतो. तिच्या मनाची घालमेल होत असते. विशेषतः ही गोष्ट तिच्या नवऱ्याने समजून घेऊन तिला थोडा वेळ दिला पाहिजे; परंतु काहींना हे कळत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात.

नवीन लग्न झालेला पती नववधूवर नाराज होता. त्याचं कारण ती त्याला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती. त्याची पत्नी लग्नानंतरच्या चार दिवसांनंतरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. यामुळं संतापून त्यानं पत्नीची हत्या केली. अंजली सेंधवा हिचं दिलीप सोनोवाबरोबर लग्न झालं. लग्नानंतर पाच दिवसांनी दिलीप पत्नीसह जिल्हा रुग्णालयात दाखल झाला, त्यानं बायको बाथरूममध्ये पडली, असं सांगितलं. अंजलीचा मृत्यू झाला पाहून तिला मृत घोषित केले. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली. शवविच्छेदन करण्यात आलं त्यातून अंजलीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला, असं स्पष्ट झालं. पोलिसांना दिलीपचा संशय आला. त्यांनी चौकशी केली; परंतु तो बोलायला तयार नव्हता. त्यानंतर ‘थर्ड डिग्री’ दाखवताच त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पत्नी शारीरीक संबंध ठेवू देत नव्हती. त्यामुळं त्यानं बायकोचं नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या केली होती.