नव्‍याने साकारणार नांदुरा तहसीलची इमारत; आमदार एकडे यांच्‍या प्रयत्‍नांना यश

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून, नांदुरा येथे तहसील इमारत बांधकामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासस्थान बांधकामासाठीदेखील निधी उपलब्ध झाला आहे. तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा शहरातील तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कामासाठी यावे …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा )ः मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्‍नांना अखेर यश प्राप्त झाले असून, नांदुरा येथे तहसील इमारत बांधकामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासस्थान बांधकामासाठीदेखील निधी उपलब्ध झाला आहे.

तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा शहरातील तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कामासाठी यावे लागते. सध्या कार्यालयातील अपुऱ्या सुविधांमुळे त्यांची गैरसोय होत होती. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांना कार्यालयात बसण्यासाठी मुबलक जागा असावी. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात येणाऱ्या तालुक्यातील अपंगांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार एकडे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सतत पाठपुरावा करून तहसील कार्यालयाची इमारत व तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्‍या निवासस्थानांना प्रशासकीय मंजुरी मिळवली आहे.