नशीब… अग्‍निशामक दलाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी हानी; बुलडाण्यात कोठारी होंडा शोरूमच्‍या गोडाऊनला आग

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली- खामगाव रोडवरील कोठारी होंडा शोरूमच्या टिनाच्या गोडाऊनला आज, 25 फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. मात्र तत्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. कोठारी होंडा शोरूमचा वेस्टेज कचरा आणि काही ऑइलचे बॅलर या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.अग्निशामक दलाला माहिती कळवताच …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली- खामगाव रोडवरील कोठारी होंडा शोरूमच्या टिनाच्या गोडाऊनला आज, 25 फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. मात्र तत्‍काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

कोठारी होंडा शोरूमचा वेस्टेज कचरा आणि काही ऑइलचे बॅलर या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.अग्निशामक दलाला माहिती कळवताच अवघ्या 10 मिनिटांच्या आत अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहचल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले. टिनशेडला अगदी लागूनच होंडा कंपनीच्या अनेक दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आग विझवण्यात लवकर यश आल्याने मोठी वित्तहानी टळली आहे. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.