नांदविण्यासाठी पतीने घरी आणलेल्या विवाहितेला सासरच्यांनी पाजले विष!; धाड येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदवण्यासाठी पतीने तिला घरी नेले. मात्र सासू, सासरे, दीर, जेठानी, नणंदेला हे खटकले. त्यांनी ती आल्या बरोबर शिविगाळ करायला सुरुवात केली. पती घराबाहेर जाताच तिला पकडून सर्वांनी तिला विष पाजले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. ही घटना धाड (ता. बुलडाणा) येथे १० जुलैला दुपारी घडली. सध्या तिच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदवण्यासाठी पतीने तिला घरी नेले. मात्र सासू, सासरे, दीर, जेठानी, नणंदेला हे खटकले. त्‍यांनी ती आल्या बरोबर शिविगाळ करायला सुरुवात केली. पती घराबाहेर जाताच तिला पकडून सर्वांनी तिला विष पाजले. त्‍यामुळे ती बेशुद्ध पडली. ही घटना धाड (ता. बुलडाणा) येथे १० जुलैला दुपारी घडली. सध्या तिच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असता तिने गुदरलेला प्रसंग कथन केला.

फौजीया आफरिन म. नशिम (२७) या विवाहितेने जबाब दिला, की तिचे लग्‍न २०१३ मध्ये गावातीलच म.नशिम म. आलीम (रा.धाड) याच्‍यासोबत झाले. तिला पाच वर्षांची मुलगी आहे. सासू, सासरे, जेठ, जेठानी व ननंद शिफा तिला नेहमी त्रास देत असल्याने ती आई-वडिलांकडे राहायला आली होती. तिने सासरकडील मंडळीविरुद्ध बुलडाणा न्यायालयात केस टाकलेली आहे. १० जुलैला दुपारी १२ वाजता तिचा पती तिच्‍याकडे आला व कोर्टातून केस मागे घे व माझ्यासोबत घरी चल, असे म्‍हणाला. आजीला सांगून ती पतीसोबत दुपारी चारला सासरी आली. तेव्हा सासू खाजुबी म.अलीम, सासरे म.अलीम म.अयुब, जेठाणी सिमा परविन म.नदीम, म. नदीम म. अलीम, नणंद शिफा कुदुसखाँन यांनी तिला पाहताच शिविगाळ करण्यास सुरुवात केली. ती घरात आली असता सासरे, दीर, जेठाणी व नणंद शिफा शिविगाळ करून अंगावर धावून येत होते. लोटपाट करत होते. सासरे दोरीने पाठीवर मारत होते, असे तिने जबाबात म्‍हटले आहे. त्यानंतर खोलीत गेली असता सासू, सासरे, दीर व शिफा असे खोलीत आले. त्यावेळी तिचे पती घरसामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. सासू व जेठाणी सिमाबी परवीन यांनी हातपाय पकडले. सासऱ्याने विषारी आैषधीची बाटली जबरदस्तीने तोंडात ओतली, असे जबाबात म्‍हटले आहे. झटापटीत काही औषध तोंडात व पोटात गेले. आरडा ओरड झाल्याने गल्लीतील लोक घरी आले. मळमळ होत असल्याने व बेशुध्द झाल्याने कोणी दवाखान्यात भरती केले हे माहीत नसल्याने फौजियाने म्‍हटले आहे. तिच्‍या जबाबावरून धाड पोलिसांनी सासू खाजुबी म. आलीम, सासरा म.आलीम म.आयुब, जेठानी सिमाबी परविन म. नसीम, दीर म.नदीम म. आलीम, नणंद शिफा कुदुसखाँन यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.