नांदुरानजीक वाहून गेलेल्या बालकाचा मृतदेह सापडला मुक्ताईनगरजवळ! बचाव पथकाने दोन दिवस घेतला शोध!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील पातोंडा येथून दुथडी वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्रात वाहून गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा मृतदेह आज, ८ सप्टेंबरला दूरवरच्या मुक्ताईनगरनजिक (जि. जळगाव खानदेश) आढळला! यासाठी बचाव पथकाने कमीअधिक ४८ तास शोध मोहीम राबविली हे येथे उल्लेखनीय! ओम गव्हाळे (१४) असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, तो ६ सप्टेंबर …
 
नांदुरानजीक वाहून गेलेल्या बालकाचा मृतदेह सापडला मुक्ताईनगरजवळ! बचाव पथकाने दोन दिवस घेतला शोध!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील पातोंडा येथून दुथडी वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्रात वाहून गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा मृतदेह आज, ८ सप्‍टेंबरला दूरवरच्या मुक्ताईनगरनजिक (जि. जळगाव खानदेश) आढळला! यासाठी बचाव पथकाने कमीअधिक ४८ तास शोध मोहीम राबविली हे येथे उल्लेखनीय!

ओम गव्‍हाळे (१४) असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, तो ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पूर्णा नदीला आलेल्या पुरात वाहून गेला होता. त्याच्या शोधासाठी यंत्रणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ७ सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेनंतर आज ओमचा मृतदेह घोडसगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव खानदेश) येथे सापडला.

या दीर्घ व मोहिमेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी जिल्हास्तरीय बचावपथक उपलब्ध करून दिल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी बुलडाणा लाइव्हसोबत बोलताना सांगितले. नदीला महापूर असल्याने बोट शिवाय मार्गच नव्हता. जिल्हा स्तरावरील शोध व बचाव पथक प्रमुख संभाजी पवार, त्यांचे सहकारी तसेच संत गाडगेबाबा शोध व बचाव पथक पिंजर (जिल्हा अकोला) चे दीपक सदाफल यांनी विशेष बोटचा वापर करून ही आव्हानात्मक शोध माेहीम पार पाडली.