नांदुरा ः पहिल्या दिवशी 114 कोरोना योद्ध्यांना लस!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्राथमिक आरोग्य केंद्रांअतर्गत आरोग्य कर्मचार्यांचे कोरोना लसीकरण आज 25 जानेवारीपासून आमदार राजेश एकडे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर भोलजीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजाहिंदल्ला खान नजीमउल्ला खान यांना पहिली लस देऊन प्रारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्राथमिक आरोग्य केंद्रांअतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांचे कोरोना लसीकरण आज 25 जानेवारीपासून आमदार राजेश एकडे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर भोलजीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजाहिंदल्ला खान नजीमउल्ला खान यांना पहिली लस देऊन प्रारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण जैस्वाल, डॉ. चेतन बेंडे व इतर आरोग्य कर्मचारी हजर होते. नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी व शहरातील खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी अशा एकूण 114 व्यक्तींनी आज कोविड लस टोचून घेतली आहे. आजपासून सात दिवस कोविड लस टोचण्याचा कार्यक्रम शासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे, असे डॉ. लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले.