नांदुरा ः सरपंचासह एकास मारहाण; टाकळी वतपाळ येथील घटना

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीवरून टाकळी वतपाळ (ता. नांदुरा) येथे अजूनही धुसफूस सुरूच आहे. 15 फेब्रुवारीला सकाळी हा वाद विकोपाला जाऊन सरपंच व त्यांच्या मावस भावास मारहाण करण्यात आली. यात दोघेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सरपंच आकाश नारायण वतपाळ व राजेंद्र निनाजी …
 

नांदुरा (प्रवीण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीवरून टाकळी वतपाळ (ता. नांदुरा) येथे अजूनही धुसफूस सुरूच आहे. 15 फेब्रुवारीला सकाळी हा वाद विकोपाला जाऊन सरपंच व त्यांच्या मावस भावास मारहाण करण्यात आली. यात दोघेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरपंच आकाश नारायण वतपाळ व राजेंद्र निनाजी घुले यांच्यात निवडणुकीपासून वाद आहे. 15 फेब्रुवारीला सरपंच वतपाळ घरी नातेवाइकांसह बसलेले असताना घुले व त्याच्या मुलांनी वतपाळ यांच्या घराच्या दरवाजाला लाथ मारली. त्यामुळे सरपंच वतपाळ व त्यांचा मावस भाऊ नीलेश बाहेर आले. यावेळी वाद होऊन घुले व त्याच्या मुलांनी दोघांना शिविगाळ करत मारहाण केली. यात नीलेश जखमी झाला. या प्रकरणी सरपंच वतपाळ यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेंद्र घुले, त्याची पत्नी अलका, मुले प्रशांत, गौरव व सागर तसेच गौरवचा सासरा अशा 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.