नांदुरा तालुक्यात दोन मुलींचा विनयभंग!

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 39 वर्षांच्या पुरुषाने 9 वर्षीय चिमुकलीचा वाईट उद्देशाने कवटाळून विनयभंग केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील टाकळी वतपाळ येथे 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत मिलिंद उर्फ महिंद्रा तायडे (39, रा. टाकळी वतपाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पीडित बालिका तिच्या लहान बहिणीसह बिस्कीट …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 39 वर्षांच्या पुरुषाने 9 वर्षीय चिमुकलीचा वाईट उद्देशाने कवटाळून विनयभंग केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील टाकळी वतपाळ येथे 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत मिलिंद उर्फ महिंद्रा तायडे (39, रा. टाकळी वतपाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पीडित बालिका तिच्या लहान बहिणीसह बिस्कीट आणण्यासाठी किराणा दुकानात गेली होती. दुकानातून परत येत असताना महिंद्रा तायडे याने 9 वर्षीय बालिकेला वाईट उद्देशाने कवटाळले. यावेळी तिने आरडाओरड केल्यावर पीडितेची आई तिथे धावून गेल्याने पीडितेला सोडून आरोपी घरात निघून गेला, अशी तक्रार पीडितेच्या आईने 9 फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी आरोपिविरोधात गुन्हा दाखल करून त्याला काल दि 10 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
15 वर्षीय मुलीचा विनयभंग
घरात एकटी पाहून 15 वर्षीय मुलीचा गावातीलच युवकाने विनयभंग केला. ही घटना सावरगाव नेहू (ता. नांदुरा) येथे 10 फेब्रुवारीला दुपारी चारच्या सुमारास घडली. राहुल सुभाष रावणचवरे असे आरोपीचे नाव आहे. त्याने घरात घुसून वाईट उद्देशाने मुलीची छेड काढली. तिने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून नांदुरा पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.