नांदुरा तालुक्‍यात गावागावात जाऊन करणार कोरोना चाचण्या

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्या वाढविण्यासाठी आता प्रत्येक गावात कोविड चाचणी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल तायडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रत्येक गावात कोविडचे लसीकरण शिबीर सुद्धा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकाला कोविड लस देण्यात येणार आहे. यासाठी गावनिहाय नियोजन तालुका स्तरावरून करण्यात …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्या वाढविण्यासाठी आता प्रत्येक गावात कोविड चाचणी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल तायडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रत्येक गावात कोविडचे  लसीकरण शिबीर सुद्धा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकाला कोविड लस देण्यात येणार आहे. यासाठी गावनिहाय नियोजन तालुका स्तरावरून करण्यात आले असून आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या गावात ही मोहीम 31 मार्च 2021 पासून सुरू होणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.