नांदुरा दोनशेच्या पल्याड; जिल्हा साडेसातशेच्या! 5 कोरोना रुग्णांनी घेतला अखेरचा श्वास!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंधरवड्यापासून उद्रेक कायम असलेल्या नांदुरा तालुक्यात गत् 24 तासांत कोरोनाचा स्फोट झाला असून, तब्बल 218 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात 773 पेशंट आढळले असतानाच 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नांदुरा तालुका कोरोनाच्या दृष्टीने तसा डेंजर झोन ठरलाय! मागील पंधरवड्यापासून तेथील उद्रेक …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पंधरवड्यापासून उद्रेक कायम असलेल्या नांदुरा तालुक्यात गत्‌ 24 तासांत कोरोनाचा स्फोट झाला असून, तब्बल 218 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात 773 पेशंट आढळले असतानाच 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

नांदुरा तालुका कोरोनाच्या दृष्टीने तसा डेंजर झोन ठरलाय! मागील पंधरवड्यापासून तेथील उद्रेक कायम आहे. अलीकडच्या संख्या लक्षात घेतल्या तर 8 मे रोजी  51, 7 तारखेला 85 तर 6 ला 70 असा तालुक्याचा स्कोअर आहे. मात्र आज तालुक्याने थेट 218 चा आकडा गाठीत यंत्रणांना थक्क केलं! काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या चिखली तालुक्याने 119 चा आकडा गाठला. याशिवाय बुलडाणा 63, खामगाव 56, देऊळगाव राजा 70, मेहकर 59, लोणार 65 मधील कोविडकुमारचा धुमाकूळ कायम असल्याचे चित्र आहे. यातुलनेत सिंदखेड राजा 30, शेगाव 26, मलकापूर 28, मोताळा 16,  जळगाव जामोद 15 हे तालुके किमान आजतरी शांत असल्याचे दिसते. संग्रामपूर (8 पॉझिटिव्ह) तालुक्यात पेशंट निघणे हीच बातमी ठरते.

पाच जण दगावले…

दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांप्रमाणेच मृत्यूच्या आकडेवारीतही चढउतार दिसून येत आहे. 8 मे रोजी 9 रुग्ण दगावले तर 7 तारखेला 11 जणांचा मृत्यू ओढावला. गत्‌ 24 तासांतील ही संख्या 5 एवढी आहे. आशीर्वाद हॉस्पिटल, महिला रुग्णालय बुलडाणा, खामगाव सामान्य रुग्णालय, दळवी हॉस्पिटल चिखली व ट्रामा सेंटर नांदुरामधील प्रत्येकी एका पेशंटचा उपचारदाराम्यान मृत्यू झाला आहे.