नांदुरा, मलकापुरात हवी वसतिगृह इमारतीसाठी खासगी जमीन

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध नाही. तसा अहवालही नांदुरा व मलकापूर तहसीलदार यांनी दिला आहे. त्यामुळे नांदुरा व मलकापूर येथे वसतिगृह इमारत बांधकामासाठी प्रत्येकी दोन एकर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदुरा व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध नाही. तसा अहवालही नांदुरा व मलकापूर तहसीलदार यांनी दिला आहे. त्यामुळे नांदुरा व मलकापूर येथे वसतिगृह इमारत बांधकामासाठी प्रत्येकी दोन एकर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने इच्छुक खाजगी जमिन मालकाने जागेच्या 7/12 व आवश्यक त्या कागदपत्रांसह 31 जानेवारी 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलडाणा या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.