नांदुरा शिवसेना तालुकाप्रमुखाला दुपट्ट्याने फाशी देण्याचा प्रयत्न!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना तालुक्यातील महाळुंगी येथे 15 जानेवारीला दुपारी 4 वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शिवसेना तालुका प्रमुख संतोष डिवरे यांचा समावेश आहे. याबाबत नागेश …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना तालुक्यातील महाळुंगी येथे 15 जानेवारीला दुपारी 4 वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शिवसेना तालुका प्रमुख संतोष डिवरे यांचा समावेश आहे.

याबाबत नागेश प्रकाश वानखडे (रा. महाळुंगी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 15 जानेवारी रोजी शिवप्रसाद जनार्दन तायडे यांच्यासह मतदान करून घरी जात असताना गावातील बसस्टॉपजवळ संतोष डिवरे, रामधन दिनकर डिवरे, विकास रमेश डिवरे, पुरुषोत्तम गुलाबराव लाहूडकार, वैभव मार्तंड डिवरे, विशाल डिवरे, प्रवीण शंकर डिवरे, नीलेश सुरेश डिवरे (सर्व रा. महाळुंगी) यांनी आमच्या विरोधात मतदान का करता, असे म्हणत मारहाण केली व शिवप्रकाश तायडे यांच्या खिशातील 4 हजार रुपये व हातातील घड्याळ काढून घेतले. या तक्रारी वरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष डिवरे (48) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 15 जानेवारीच्या दुपारी 4.30 दरम्यान हरिश्‍चंद्र लेनजी वानखडे, सुखदेव यादव तेलंग, कडुबा किसन इंगळे, भास्कर सुधाकर वानखडे व जनाराव वानखडे यांच्यासह बसस्टॉपवर गप्पा मारत उभे असताना आरोपी नागेश प्रकाश वानखडे, प्रविण प्रकाश वानखडे, शिवचंद्र जनार्दन तायडे, अशोक संपत वानखडे, प्रकाश संपत वानखडे, गजानन जनार्दन तायडे, राहुल संपत वानखडे यांनी येऊन यांनी माझ्यासोबत गप्पा मारत असणार्‍यांना शिवागीळ करून मारहाण करू लागले. मी समजावण्याचा प्रयत्न केला असता माझ्या गळ्यातील दुपट्ट्याने फाशी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या खिश्यातील 4 हजार रुपये काढून घेतले. या तक्रारी वरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी. बी. तडवी (मलकापूर) व नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे करत आहेत.