नांदुऱ्यात कोरोना चाचण्या सुरू; काल रेडिमेडवाले झाले, आज फर्निचर-हार्डवेअरवाल्यांचा नंबर… तुमचा नंबर कधी ते वाचा…

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या सूचनेप्रमाणे नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी शहरातील व ग्रामीण भागातील व्यक्तीची आरटीपीसीआर चाचण्या नांदुरा कोविड सेंटरमध्ये सुरू केल्या आहेत. 22 फेब्रुवारीला सर्व किराणा दुकानदारांची तपासणी झाली. 23 तारखेला सर्व रेडिमेड कापड दुकानदारांची तपासणी करण्यात आली. आज, 24 फेब्रुवारीला सर्व फर्निचर व …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या सूचनेप्रमाणे नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी शहरातील व ग्रामीण भागातील व्यक्तीची आरटीपीसीआर चाचण्या नांदुरा कोविड सेंटरमध्ये सुरू केल्या आहेत.

22 फेब्रुवारीला सर्व किराणा दुकानदारांची तपासणी झाली. 23 तारखेला सर्व रेडिमेड कापड दुकानदारांची तपासणी करण्यात आली. आज, 24 फेब्रुवारीला सर्व फर्निचर व हार्डवेअर दुकानदारांची चाचणी केली जाणार आहे. उद्या सर्व ज्वेलर्स दुकानदार, 26 तारखेला स्टेशनरी व सर्व जनरल स्टोअर्स दुकानदार, 1 मार्चला हॉटेल, नास्ता, भांडार, चहा, व्यवसायिक सर्व दुकानदार, 2 मार्चला फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते, 3 मार्चला ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक, 4 मार्चला मोबाईल, टिव्ही, इलेक्ट्रॉनिक सर्व दुकाने, 5 मार्चला सर्व सलून दुकानदार, 6 मार्चला पेट्रोल पंप मालक व सर्व कर्मचारी, 8 मार्चला मेडिकल, औषध विक्रेते व सर्व कर्मचारी, 9 मार्चला कृषी केंद्र व सर्व बियाणे दुकानदार, 10 मार्चला सर्व खाजगी दवाखाने, स्टाफ, कर्मचारी, 11 मार्चला आठवडे बाजार सर्व व्यावसायिक दुकानदार, 12 मार्चला कृषि उत्पन्न बाजार समिती कर्मचारी व बैल बाजार सर्व व्यवसायिक, कामगारांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. सर्वांनी कोरोना तपासणी करून घ्यावी. आपल्या दुकानांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे की, मास्‍क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. टेस्ट करून न घेतल्यास साथ रोग आपत्ती कायद्यनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार राहुल तायडे यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. नांदुरा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण शहरात फिरू नये. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.