नांदुऱ्यात दोन अपघात : धावत्या मालगाडीखाली येऊन वृद्ध गंभीर; ट्रक रोडखाली जाऊन चालक जखमी

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील जळगाव जामोद रोडवरील रेल्वे गेटजवळ धावत्या मालगाडी खाली येऊन वृद्ध गंभीर जखमी झाला. ही घटना काल, 26 जून रोजी दुपारी घडली. सूर्यभान जाणूजी इंगळे (73, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे जखमीचे नाव आहे. शुभम भिडे यांनी त्यांचा हात ओढून त्यांना मालगाडी बाहेर खेचले. त्यामुळे त्यांचे …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील जळगाव जामोद रोडवरील रेल्वे गेटजवळ धावत्या मालगाडी खाली येऊन वृद्ध गंभीर जखमी झाला. ही घटना काल, 26 जून रोजी दुपारी घडली.

सूर्यभान जाणूजी इंगळे (73, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे जखमीचे नाव आहे. शुभम भिडे यांनी त्यांचा हात ओढून त्यांना मालगाडी बाहेर खेचले. त्‍यामुळे त्‍यांचे प्राण वाचले. त्यांना तात्काळ ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार, प्रवीण डवंगे, कमलेश बोके, गणेश वाकोडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता खामगाव येथे हलविण्यात आले आहेत.

नियंत्रण सुटून ट्रक रोडखाली, चालक जखमी
नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकला राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा येथील डागा पेट्रोल पंपनजीक अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाला. ही घटना काल 26 जूनला दुपारी दीडच्‍या सुमारास घडली. एमएच 48 बी एम 2931 क्रमांकाचा ट्रक नागपूरवरून मुंबईकडे जात असताना येथील डागा पेट्रोल पंपानजीक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो रोडच्या खाली गेला. यात भोला यादव (40, रा. एकवणी जिल्हा जोनपूर, उत्तरप्रदेश) हा चालक जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकार ,प्रवीण डवंगे, सोनू जैस्वाल, संतोष जुनगडे यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमी चालकाला उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.