नांदुऱ्यात मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त!; घरांच्‍या झडतीतून ११ तलवारी, ५ फायटर जप्‍त, दोघे ताब्‍यात

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरात मोठा शस्त्रसाठा बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आज, १८ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास जप्त केला. ११ तलवारी आणि ५ फायटर घरात लपवून ठेवले होते. या शस्त्रांसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईने नांदुऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. सागर श्रीकृष्ण देवकर (२४, रा. मोतीपुरा, नांदुरा) व नीलेश सुरेश डवले …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरात मोठा शस्‍त्रसाठा बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) आज, १८ जुलैला सायंकाळी पाचच्‍या सुमारास जप्‍त केला. ११ तलवारी आणि ५ फायटर घरात लपवून ठेवले होते. या शस्‍त्रांसह दोघांना ताब्‍यात घेण्यात आले. या कारवाईने नांदुऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

सागर श्रीकृष्ण देवकर (२४, रा. मोतीपुरा, नांदुरा) व नीलेश सुरेश डवले (३५, रा. वॉर्ड क्र. २ नांदुरा) अशी आरोपींची नावे आहेत. नीलेशला अटक करण्यात आली असून, सागरची वृत्त लिहीपर्यंत चौकशी सुरू होती. नीलेशच्‍या घरात अवैध शस्‍त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती “एलसीबी’ला मिळाली होती. त्यावरून त्‍याच्‍या घराची झडती घेण्यात आली. झडतीत तब्बल १० तलवारी आणि ५ फायटर मिळून आले. हा शस्‍त्रसाठा जप्‍त करण्यात आला आहे. नांदुरा शहरातीलच मोतीपुरा भागात राहणाऱ्या सागर श्रीकृष्ण देवकर याच्याकडूनही “एलसीबी’ने एक तलवार ताब्यात घेतली आहे. दोघांविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा)यांच्या मार्गदर्शनाखाली “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पो.ना. गजानन गोरले, सतिश जाधव व चालक पोकाँ मधुकर रगड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.नांदुऱ्यात मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त!; घरांच्‍या झडतीतून ११ तलवारी, ५ फायटर जप्‍त, दोघे ताब्‍यात