नांदुऱ्यात शिक्षकाचे घर फोडून पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील स्वामी समर्थनगरात शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी १ लाख ८९ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना ९ जुलै ते ११ जुलैच्या दरम्यान घडली. नीलेश संतोष लेनेकर (३८) यांनी ११ जुलैला रात्री उशिरा नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की ते ९ जुलै ते ११ जुलै दरम्यान कुटुंबासह …
 
नांदुऱ्यात शिक्षकाचे घर फोडून पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील स्वामी समर्थनगरात शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी १ लाख ८९ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना ९ जुलै ते ११ जुलैच्या दरम्यान घडली.

नीलेश संतोष लेनेकर (३८) यांनी ११ जुलैला रात्री उशिरा नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की ते ९ जुलै ते ११ जुलै दरम्यान कुटुंबासह अजिंठा येथे गेले होते. ११ जुलैला दुपारी साडेतीनला परत आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. बेडरूममधील कपाट तोडलेले दिसले. कपाटातून पत्नीची सोन्याची गहूपोत १४ ग्रॅम, सोन्याची अंगठी ५ ग्रॅम, कानातील सोन्याची कर्णफुले ५ ग्रॅम, सोन्याची पोत १० ग्रॅम व नगदी १५ हजार रुपये, देव्हाऱ्यावर ठेवलेल्या चांदीच्या खंडोबाच्या मूर्ती (१०० ग्रॅम), लक्ष्मीची चांदीची मूर्ती १०० ग्रॅम असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा माल चोरट्याने चोरून नेला. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल दौड करत आहेत.