नाईट वॉकिंगला गेले होते…घरच्यांना धक्कादायक बातमी कळली!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्री जेवणानंतर नाईट वॉक करायला गेलेल्या 35 वर्षीय तरुणाला उडवून अज्ञात वाहन पसार झाले. ही घटना काल, 23 जानेवारीला रात्री घडली.नितीन सुधाकर वसाडकर (रा. जोशीनगर, खामगाव) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की माझे भाऊ नीलेश सुधाकर वसाडकर नेेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर वॉकिंगसाठी नॅशनल हायवेने घाटपुरी गावाकडे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्री जेवणानंतर नाईट वॉक करायला गेलेल्या 35 वर्षीय तरुणाला उडवून अज्ञात वाहन पसार झाले. ही घटना काल, 23 जानेवारीला रात्री घडली.
नितीन सुधाकर वसाडकर (रा. जोशीनगर, खामगाव) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की माझे भाऊ नीलेश सुधाकर वसाडकर नेेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर वॉकिंगसाठी नॅशनल हायवेने घाटपुरी गावाकडे जात होते. त्यांना कुठल्या तरी वाहनाने उडवून दिले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.